कोकणमहाराष्ट्र

उरण येथे १९ जूनला शेकापचा कार्यकर्ता मेळावा

उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे ) : शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दि.19 जून रोजी  शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात मेळाव्याचे चे आयोजन करण्यात आले सल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, दिनांक 19 जून 2023 रोजी दुपारी 2 वाजता मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी, उरण येथे उरण तालुक्यातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य निवडून आले त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दहावी व बारावी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अडव्होकेट आस्वाद पाटील,माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे,ज्येष्ठ नेते काका पाटील, माजी चिटणीस मेघनाथ तांडेल, उरण तालुका अध्यक्षा सीमा घरत, माजी उपसभापती महादेव बंडा, माजी सभापती नरेश घरत,माजी जि.प. सदस्य जीवन गावंड,उरण विधानसभा  अध्यक्ष रमाकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच नाईकनगर झोपडपट्टी येथे अन्नदान, उरण सरकारी हॉस्पिटलमध्ये फळ वाटप व खाऊ वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या मेळाव्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विकास नाईक व महिला आघाडी अध्यक्ष सीमा घरत यांनी केले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button