डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील स्मारकाला भेट सर्वोच्च आनंदाचा क्षण : उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील स्मारकाला भेट

लंडन : महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील स्मारकाला नुकतीच भेट दिली. रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील स्मारकाला भेट हा आपल्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे स्मारकातील अतिथी अभिप्राय पुस्तिकेत अभिप्राय लिहिताना म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या लंडनमधील दौऱ्यात नुकतीच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये असताना 1921 ते 1922 या कालावधीत ज्या घरात राहिले त्या घराचे आता बाबासाहेबांच्या नावाने स्मारक बनवण्यात आले आहे. या स्मृती भवनाला लंडन दौऱ्यादरम्यान ना. उदय सामंत यांनी आवर्जून भेट दिली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमध्ये स्मारक असणे ही बाब एक भारतीय म्हणून गौरवांकित करणारी असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.



