कोकणमहाराष्ट्रसाहित्य-कला

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टमधे सांस्कृतिक कलाधोरण ठरविण्यासाठी चर्चासत्र

संगमेश्वर दि . २० ( प्रतिनिधी ): महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक धोरण ठरवण्यासंदर्भात शासनाने एक समिती स्थापन केली असून त्यातील दृश्यकला विषयाचे प्रमुख सुहास बहुलकर आहेत त्यांच्यासोबत या समितीत प्राध्यापक जी. एस माजगावकर (कोल्हापूर ) डॉ.श्रीकांत प्रधान (पुणे) प्राध्यापक. चंद्रकांत चन्ने (नागपूर ),उपयोजित कला विषयाचे तज्ञ चित्रकार सुनील महाडिक (मुंबई) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक गणेश तरतरे हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

ही समिती महाराष्ट्रात विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील शासकीय संग्रहालय अभ्यासणार आहेत. त्यासोबत चित्रकार,शिल्पकार,उपयोजित चित्रकार, हस्त कारागीर,कलासंग्रहाक,कलाशिक्षक, कलारसिक यांच्याशी चर्चा करून या चर्चेत महाराष्ट्रात एकूणच दृश्यकला विषयक आपल्याला काय अपेक्षा आहेत याबाबत चर्चा होणार आहे. त्यानुसार शासनाला काय करता येईल याबाबत ठोस सूचना कराव्यात असा या कोकण दौऱ्याचा हेतू आहे.

कोकणातील या सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने कोकणातील अग्रगण्य चित्र शिल्प कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट,सावर्डे येथे दि.२४ जून २०२३ रोजी सकाळी १०वा. चर्चासत्र होणार आहे. यासाठी रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील सर्व चित्रकार,शिल्पकार, उपयोजित कलाकार,हस्त कारागीर, कलाशिक्षक, कलासंग्राहक,कलारसिक यांनी उपस्थित राहून उपरोक्त कलाविषयक धोरणासाठी योग्य त्या सूचना कराव्यात अशी अपेक्षा आहे. तसेच सभेसाठी येतांना आपण आपल्या अपेक्षा व सूचना लेखी स्वरूपात समितीकडे द्याव्यात हि नम्र विनंती आहे. असे आवाहन कोकणचे जेष्ठ चित्रकार -शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांनी केले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button