पोलिसांनी दुर्गम गावात फिरणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांची माहिती ठेवावी

युवा सेना (शिंदेगट) संगमेश्वर उपतालुका प्रमुख सुधीर चाळके यांची मागणी
संगमेश्वर (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी-फुणगुस पंचक्रोशी गावातील दुर्गम गावांमध्ये अनेक परप्रांतीय व्यवसाय करीत आहेत. त्यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांना गावातील लोकांकडून कोणताही त्रास नाही किंवा आक्षेप नाही. सध्याच्या काळात या परप्रांतीय व्यावसायिकांचा सुळसुळाट एवढा झाला आहे की, गावातील अशिक्षित लोकांना आणि वयस्कर लोकांना गंडवण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार रोखणेसाठी त्यांची माहीती संकलीत करून नोंदी ठेवून त्यांना कार्ड द्यावे अशी मागणीचे निवेदन युवा सेनेचे सुधिर चाळके यांनी उप पोलीस अधीक्षक यांना दिले.

तालुक्यातील परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्याबरोबरच काही व्यवसाईक हे परराज्यात गुन्हा करून इकडे दुर्गम गावात वावरत असतात. याकडे गांभीर्याने लक्ष वेधत प्रत्येक गावातील बिट पोलीस स्टेशनमधे परप्रांतीय यांच्या नोंदी असाव्यात.तसेच शक्य झाल्यास त्यांना पोलीस कार्ड देण्याय यावं जेणेकरून एखादी चुकीची घटना घडली असता पोलिसांना देखील योग्य तपास करण्यास मदत होईल. या विषयीचे निवेदन उप पोलीस अधीक्षक जयश्री पाटील व संगमेश्वर पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांना देण्यात आले.
या वेळी उपतालुकाप्रमुख जमृत भाई अलजी. तैमूर अलजी. आणि युवासेना विभाग प्रमुख प्रथमेश साळवी उपस्थित होते.
निवेदन स्विकारलेवर उप पोलीस अधिक्षक जयश्री पाटील यांनी त्वरीत अंमलबजावणी करण्याचे आदेश संगमेश्वर पोलीसांना दिले.



