रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या हद्दीत नागोठणे ते रोहा दरम्यान दि. २९ व ३० मार्च २०२४ रोजी तांत्रिक कारणासाठी ब्लॉक घेण्यात आल्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या अशा मिळून एकूण चार एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
या संदर्भात मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 व 30 मार्च 2024 रोजी रेल्वेकडून तांत्रिक करण्यासाठी ‘एस अँड टी ब्लॉक’ घेतला जाणार आहे. नागोठणे ते रोहा या सेक्शनमधील कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या एकूण चार गाड्या सुमारे 40 ते 50 मिनिटे उशिराने धावणार आहे.
वेळापत्रकावर परिणाम होणाऱ्या गाड्या
- 1) 19578 : ही जामनगर ते तिरूनेलवेली दरम्यान धावणारी आणि दि. 29 मार्च रोजी प्रवास सुरू होणारी एक्सप्रेस.
- 2) 12617 : ही एर्नाकुलम ते निजामुद्दीन (दिल्ली) दरम्यान धावणारी आणि दिनांक 29 रोजी प्रवास सुरू होणारी मंगला एक्सप्रेस.
- 3) 16345 : ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी दिनांक 30 मार्च रोजी प्रवास सुरू होणारी नेत्रावती एक्सप्रेस
- 4) 20931 : ही कोचुवेली ते इंदूर दरम्यान धावणारी दिनांक 30 मार्च रोजी प्रवास सुरू होणारी एक्सप्रेस गाडी.
रेल्वेने तांत्रिक ब्लॉक घेतलेल्या नागोठणे ते रोहा या सेक्शनमध्ये रोहा येथे मध्य रेल्वेला कोकण रेल्वेकडे गाड्या हॅन्ड ओव्हर कराव्या लागतात. किंवा कोकण रेल्वे मार्गावरून आलेल्या गाड्यांचा आपल्याकडे ताबा घ्यावा लागतो. दिनांक 29 व 30 रोजी च्या तांत्रिक ब्लॉकमुळे वरील गाड्यांना या प्रक्रियेसाठी सुमारे 40 ते 50 मिनिटे अधिकची लागणार आहेत. त्यामुळे साहजिकच या चारही गाड्यांमधील प्रवाशांना विलंब सहन करावा लागणार आहे.