कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर
रत्नागिरी : राज्य शिक्षण संचालनालय (योजना) चे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.त्यांनी रत्नागिरी येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहे.
राज्यातील दहा शिक्षण उपसंचालकांना सहसंचालक म्हणून राज्य शासनाने १५ ऑक्टोबर रोजी पदोन्नती दिली आहे. त्यात क्षीरसागर यांचा समावेश आहे.
राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद येथे सहाय्यक आयुक्त, रत्नागिरी व सातारा येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले. पुणे येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत शिष्यवृत्ती परीक्षा तसेच ऑनलाइन टंकलेखन परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय कामकाज केले.
जून २०१८ ते डिसेंबर २०२० या कालावधीतील सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय ठरली. डिसेंबर २०२० मध्ये त्यांची सातारा माध्यमिक शिक्षण अधिकारी पदावरून उपसंचालक म्हणून पुणे येथील योजना शिक्षण संचालनालयात पदोन्नती झाली होती.
आता महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशासन शाखा गट-अ मधील सहसंचालक व तत्सम पदावरील विभागीय बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.