देश-विदेशमहाराष्ट्रराजकीय

खा. नारायणराव राणे यांची रत्नागिरीतील लोकप्रतिनिधींनी घेतली भेट

  • रत्नागिरीतील दुष्काळी स्थिती आणि त्यावरील उपाययोजनेवर झाली चर्चा

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त रत्नागिरीत आलेल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांची रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहावर रत्नागिरीतील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्य आणि जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीवर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा नियोजन बैठकीकरिता हे सर्व मान्यवर रत्नागिरीत आले होते.

या भेटी दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार, आमदार अनिकेत तटकरे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे उपस्थित होते.

सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे मोठे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत आणि प्रशासनाने कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे, याविषयी खा. नारायण राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी केवळ राज्य आणि देशांतर्गत दुष्काळी परिस्थितीच नव्हे, तर देशाबाहेरील युद्धजन्य स्थितीचाही व्यापक विचार करून भविष्यात अन्नधान्य, पाणी आणि इतर महत्त्वाच्या बाबींच्या नियोजनासाठी देश आणि राज्याने कोणती पावले उचलली पाहिजेत, यावरही त्यांनी सविस्तर विचारविनिमय करत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. नागरिकांना कोणत्याही संकटाचा सामना करताना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून वेळीच ठोस पावले उचलली पाहिजेत असेही खा. राणे यांनी सांगितले.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button