कोकणमहाराष्ट्र

Electric Shock : लाटवण येथे विजेचा धक्का बसून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील लाटवण गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.  विजेचा तीव्र धक्का (Electric Shock) लागून १० वर्षीय मयूर अनिल पवार याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे  गावावर शोककळा पसरली असून मयूरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बराच वेळ मयूर हा दिसला नाही म्हणून कुटुंबीयांनी शोध घेतला असता, त्याचा मृतदेह हायस्कूलजवळील बांबूच्या बेटाजवळ विजेचा धक्का लागलेल्या अवस्थेत आढळून आला. आपल्या पोटच्या गोळ्याचा असा मृतदेह पाहताच कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली.

मयूरच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र तीव्र शोक व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button