कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रशिक्षणशिक्षण

लोकनृत्य स्पर्धेत उरणचे कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय युवा महोत्सवात द्वितीय

उरण (विठ्ठल ममताबादे ) : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत लोकनृत्य या स्पर्धेत कोंकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, विद्यार्थी, शिक्षक व महाविद्यालयीन प्रशासनाकडून विजेत्या संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या अंतिम फेरीत मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत तब्बल ५७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कोंकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण च्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून परीक्षकांची मने जिंकत द्वितीय क्रमांक मिळवला.

या उल्लेखनीय यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पराग कारुळकर, सांस्कृतिक समिती, सर्व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान राहिले.

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल कोंकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरणचे व्यवस्थापन, प्राचार्य, सांस्कृतिक विभाग तसेच शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे हे यशस्वी फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button