
कणकवली : देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत कोकण रेल्वेकडून विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. कोकण रेल्वेच्या विविध स्थानके,कार्यालयांमध्ये या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवले जात आहे.

विविध शाळा, महाविद्यालये, सामजिक संस्था यांचा या उपक्रमात सहभाग घेतला जात आहे.स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना स्वच्छतेचे महत्व पटवून देताना लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रभात फेऱ्यांचे आयोजन केले जात आहे.नुकत्याच कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम आणि जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले होते.
या अंतर्गत कणकवली स्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.यात अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या अंतर्गत लोकांमध्ये जागृती करण्यात आली.



