कोकणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात चिपळूणमधील दोघांचा मृत्यू

चिपळूण : सातारा जिल्ह्यात पुणे-सातारा महामार्गावर सुरूर येथे झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात चिपळूण तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातात प्राण गमावलेले दोघेही चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कार चालकाला झोप आल्यावर झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

मृत्यूमुखी पडलेले दोघेही खेर्डी (ता. चिपळूण) येथील असल्याचे सातारा येथून कळवण्यात आले आहे. विजय धोंडू पवार (७१) आणि वैष्णवी वैभव कदम (४३) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या  दोघांची नावे आहेत. या अपघातात मृतांव्यतिरिक्त अन्य तिघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button