मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे श्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच राज्याचे कौशल्य विकास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गोव्यातील मडगाव ते मुंबई दरम्यान शुभारंभ झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस से स्वागत केले.
कोकण रेल्वे मार्गावर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागत समारभावेळी खासदार श्री राहुल शेवाळे, श्री कृपाल तुमाने श्रीमती यामिनी जाधव माननीय आमदार, श्री नरेश ललवानी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे आणि श्री रजनीश गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राणी कमलापती (भोपाळ) स्थानकावरून 5 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राणी कमलापती रेल्वे (भोपाळ) स्थानकावरून विविध शहरांसाठी 5 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. तपशील खालीलप्रमाणे:-
- राणी कमलापती (भोपाळ)-इंदूर वंदे भारत एक्सप्रेस
- भोपाळ-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस
- रांची-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस
- धारवार- बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
- गोवा (मडगाव) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस गोवा (मडगाव)-मुंबई नवीन वंदे भारत एक्स्प्रेस उद्घाटन विशेष मडगाव येथून 11.10 वाजता निघाली आणि 21.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचली.
दिनांक 28.06.2023 पासून मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची नियमित सेवा सुरू होणार आहे आणि 29.06.2023 मडगाव पासून. मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत:- नॉन मॉन्सून वेळा:
22229 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून 05.25 वाजता सुटेल आणि 13.10 वाजता मडगावला पोहोचेल.
22230 मडगावहून 14.40 वाजता निघेल आणि 22.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोहोचेल. मान्सूनच्या वेळा:
22229 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून 05.25 वाजता सुटेल आणि मडगावला 15.30 वाजता पोहोचेल.
22230 मडगावहून 12.20 वाजता निघेल आणि 22.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोहोचेल. थांबे: दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम.
पनवेल येथे श्री प्रशांत ठाकूर, माननीय आमदार, आणि ठाणे येथे श्री राजन विचारे माननीय खासदार, यांनी वंदे भारत ट्रेनचे स्वागत केले.