लांजातील रिक्षा व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा ; ५० हजाराचा प्रवासी महिलेचा ऐवज केला परत!
लांजा : रिक्षा व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी तळवडे येथील योगेश उर्फ मुन्ना पाटोळे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत रेल्वे प्रवासी सौ. खामकर कुरुचुंब यांचा सुमारे 50 हजार रुपये किमतीचा ऐवज असलेले पर्ससंबंधित महिलेला परत केली. ही घटना मंगळवारी सकाळी आडवली रेल्वे स्थानक येथे घडली.
सौ. खामकर या मे महिन्याच्या सुट्टीसाठी कुटुंबासह तुतारी एक्सप्रेसने गावी कुरुचुंब येथे येण्यासाठी सकाळी आडवली स्थानकात उतरल्या. आडवली स्थानकातुन कुरुचुंब गावी जाण्यासाठी त्यांनी तळवडे येथील मुन्ना पाटोळे यांची रिक्षा भाड्याने केली. कुरुचुंब येथे घरी सोडून आल्यानंतर मुन्ना पाटोळे यांना रिक्षात एक पर्स विसरली असल्याचे लक्षात आले पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम होती आणि खामकर यांचा फोटो प्रत होती आडवली रेल्वे स्थानक येथील सर्व रिक्षा चालक मालक यांनी त्वरित सोशल मीडियावर पर्स विसरली असल्याचे निवेदन केले. त्यानंतर काही तासात ही पर्स कुरुचुंब येथील खामकर यांची असल्याचे सिद्ध झाले खामकर यांनी ओळख पटवून रिक्षा संघटना आडवली रेल्वे स्थानक यांनी सदर महिलेला पर्स ऐवजासह परत केली. मुन्ना पाटोळे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे