कोकणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्ररेल्वे
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर २९ ऑगस्टला ‘मेगाब्लॉक’

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी साडेसात ते साडेदहा असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या या मेगाब्लॉकमुळे या कालावधीत या भागातून पास होणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामध्ये तिरुनेलवेली ते जामनगर एक्सप्रेस (19577) जिचा प्रवास 28 ऑगस्ट रोजी सुरू होतो ती गाडी कर्नाटकातील ठाकूर ते रत्नागिरी दरम्यान अडीच तास थांबवून ठेवले जाणार आहे.
त्याचबरोबर तिरुअनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी (16346) ही अप नेत्रावती एक्सप्रेस जिचा प्रवास 28 ऑगस्ट रोजी सुरू होतो ती ठोकर ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान सुमारे एक तास रोखून ठेवली जाणार आहे



