कोकणदेश-विदेशपर्यटनमहाराष्ट्ररेल्वे

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या या गाडीच्या वेळेत झाला बदल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर जून ते ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या पावसाळी वेळापत्रकानुसार मंगळूर सेंट्रल ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या दैनंदिन एक्सप्रेसच्या वेळेत किंचितसा बदल झाला आहे.

देशभरातील संपूर्ण रेल्वे झोनमध्ये फक्त कोकण रेल्वे मार्गावरच पावसाळ्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक

कोकणात मुसळधार कोसळणारा पाऊस आणि त्यामुळे रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याच्या संभाव्य घटना, रेल्वे रुळांवर पाणी येणे अशा घटना लक्षात घेऊन देशभरात फक्त आणि फक्त कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी 10 जून नंतर 31 ऑक्टोबरपर्यंत मानसून टाईम टेबल आखले जाते. या कालावधीत या मार्गे धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.

कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकामुळे मंगळूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६२०) मडगाव जंक्शन वरील वेळेत बदल झाला आहे. आतापर्यंत ही गाडी मुंबईकडे जाताना सायंकाळी सात वाजून 35मिनिटांनी मडगाव स्थानकावर येऊन ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटत होती. आता ती सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांऐवजी ७ वाजून ४० मिनिटांनी मुंबईसाठी सुटणार आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button