जैन समाज रत्नागिरी संघटनेतर्फे गुरूकुल वसतिगृहात मुलींना कपडे वाटप

देवरूख (सुरेश सप्रे) : कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळ कोळंबे हि संस्था कोळंबे येथील गुरुकुल मुलींच्यै वसतिगृहात भारतीय जैन संघटना रत्नागिरी यांनी स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून या वसतिगृहातील 25 मुलींसाठी नवीन कपडे प्रदान केले व स्वतंत्रता दिवसानानिमित्त शाळेत जिलेबी चे वाटप देखील केले.
यावेळी भारतीय जैन समाज याचे अध्यक्ष चेतन गांधी खजिनदार निलेश गांधी आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोळंबे संस्था चालवत असलेले हे वसतिगृह विना अनुदानित तत्वावर सुरू आहे. या वसतिगृहा मध्ये ग्रामीण भागातील आणि आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना मोफत रहाण्याची व शिक्षणाची सोय इथे केली जाते.
यामुलीना वेळोवेळी असंख्य गोष्टीची आवश्यकता नेहमीच असते. अशावेळी असंख्य दाते उभे देखील रहातात.तसेच यावेळी भारतीय जैन समाज संघटना रत्नागिरी यांनी मोलाची मदत केलेबद्दल संस्थेचेवतीने संस्था सदस्य अमोल पाटणे यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाला संस्थाअध्यक्ष नयन मुळ्ये, रवींद्र मुळ्ये.मुख्याध्यापक संजय मुळ्ये, विजय चव्हाण,शिवराम जोशी. सदानंद जुवेकर व मुलींच्या वसतिगृहाच्या अधिक्षिका आदी उपस्थित होते.



