बारावीचा उद्या दुपारी ऑनलाईन निकाल

रत्नागिरी : फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल गुरुवारी दुपारी जाहीर होणार आहे.
जिल्ह्यातील १७००० विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. हा निकाल गुरुवारी २ वाजता जाहीर होणार आहे. बोर्डाकडून या परीक्षेला २६ हजार विद्यार्थी बसले होते त्यापैकी १७ हजार विद्यार्थी जिल्ह्यातील आहेत.
फेब्रवारी-मार्च 2023 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालियीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकड़े विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाच्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार योजने अंतर्गत उपलब्ध राहतील.
जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित करण्यात येणाच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्याध्थ्यासाठी सोमवार दि. 29 मे 2023 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
गुणपत्रिका, मायग्रेशन प्रमाणपत्र ५ जूनला मिळणार
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र त्यांच्या उच माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सोमवार दि.5 जून 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता वितरित करण्यात येतील, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.



