महाराष्ट्र
लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहात मृदगंध पुरस्कार वितरण

मुंबई : विठ्ठल उमप फाउंडेशन आयोजित १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व मृदगंध पुरस्कार २०२३चे वितरण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अभिनेते दिलीप प्रभावळकर, गायक सुदेश भोसले,अभिनेत्री केतकी माटेगावकर, अनुराधा भोसले, चिन्मयी सुमित, अभिनेते सुमित राघवन, आतांबर शिरढोणकर यांना मना. सामंत व विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, संयोजक नंदेश उमप, सरिता उमप आदी उपस्थित होते.



