कोकणक्रीडाविश्वदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डॉ. योगिता खाडे यांना सुवर्ण तर हुजैफा ठाकूर यांना कांस्य पदक

पणजी : गोवा येथे झालेलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सिकई मार्शल आर्ट या खेळात डॉ. योगिता खाडे यांनी महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक तर हुजैफा शरीफ ठाकुर यांनी कांस्यपदक मिळवून दिले.


या खेळाडूंना सिकई फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ग्रँडमास्टर नजीर अहमद मीर, महाराष्ट्र सिकई असोसिएशनचे अध्यक्ष मझहर खान, सचिव, रवींद्र गायकी, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक नीलोफर खान, विजय तांबटकर व संघ व्यवस्थापक दिनेश राऊत, वीरभद्र कवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल त्यांचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिम्पिक सचिव, नामदेव शिरगावकर, सी. ए. तांबोळी यांनी अभिनंदन केले.



