कोकणक्रीडाविश्वदेश-विदेश
उरणच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय बँडी स्पर्धेत सुवर्ण भरारी!

- वरदा असारकर, सात्विक बाजी आणि शिवांश तांडेल यांना सुवर्णपदक; रायगड जिल्ह्याचा अभिमान उंचावला
उरण (विठ्ठल ममताबादे ) : आठव्या राष्ट्रीय बँडी अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील तीन युवा खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. वरदा केदार असारकर, सात्विक बाजी आणि शिवांश तांडेल या तिन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णपदक मिळवून उरणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत वरदा असारकर हिने १२ वर्षांखालील मुलींच्या (U-12 Girls) गटातून सहभाग घेत सुवर्णपदक पटकावले तर सात्विक बाजी आणि शिवांश तांडेल यांनी १२ वर्षांखालील मुलांच्या (U-12 Boys) गटातून खेळताना सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.



