कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूषखबर!

- लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणार वीकेंड स्पेशल ट्रेन; पाहा वेळापत्रक आणि थांबे
रत्नागिरी / मुंबई : वीकेंडला होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठी खूशखबर दिली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव जंक्शन दरम्यान अतिरिक्त वीकेंड स्पेशल ट्रेन्स चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
गाडी क्र. 01029 / 01030 लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) स्पेशल चे वेळापत्रक:
- गाडी क्रमांक 01029 (LTT ते मडगाव): ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०२/१०/२०२६ (शुक्रवार) आणि ०४/१०/२०२६ (रविवार) रोजी मध्यरात्री ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01030 (मडगाव ते LTT): ही गाडी मडगाव जंक्शन येथून ०२/१०/२०२६ (शुक्रवार) आणि ०४/१०/२०२६ (रविवार) रोजी दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा :
ही ट्रेन ठाणे, पनवेल, पेन, रोहा, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना (Coaches):
या ट्रेनमध्ये एकूण २२ कोच असतील. यामध्ये ३-टायर एसी (०४ कोच), स्लीपर (११ कोच), जनरल (०५ कोच) आणि एसएलआरडी (०२ कोच) यांचा समावेश आहे.
अधिक माहिती आणि बुकिंगसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.



