कोकणदेश-विदेशमहाराष्ट्र

सावंतवाडी रोड स्थानकावर लवकरच दोन प्रवासी लिफ्ट; कोकण रेल्वेची निविदा प्रक्रिया सुरू

  • फलाटावरून प्रवाशांना चढउतार करणे होणार सुलभ

सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. स्थानकावर प्लॅटफॉर्मवरून चढ-उतार करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी दोन नवीन प्रवासी लिफ्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी कोकण रेल्वेकडून निविदा मागवण्यात आल्या असून, निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर 2026 आहे.

​अलीकडच्या काळात सावंतवाडी रोड स्थानकावर अनेक नवीन लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या गर्दीचा विचार करता ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी लिफ्टची अत्यंत गरज होती.

​प्रवाशा सोयीसुविधा आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील सुविधांच्या विस्तारावर भर दिला आहे. या दोन लिफ्ट कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button