कोकणदेश-विदेशपर्यटनब्रेकिंगमहाराष्ट्ररेल्वे

नांदेड-सावंतवाडी कायमस्वरूपी साप्ताहिक एक्सप्रेस चालवावी

मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे रेल्वेला पत्र

रत्नागिरी / नांदेड : गणेशोत्सवाच्या काळात नांदेडहून सावंतवाडीसाठी चालवण्यात आलेल्या विशेष ट्रेनला प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर, नांदेड-सावंतवाडी-नांदेड ही रेल्वे सेवा आता कायमस्वरूपी साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे.

रेल निलयम सिकंदराबाद येथे मराठवाडा रेल्वे संघटनेचे सदस्य अरुण मेघराज आणि कादीरलाला जी यांनी श्रीमती पांडे (मुख्य मुख्य वाणिज्य व्यवस्थापक) यांची भेट घेऊन नांदेड विभागातील रेल्वेच्या विविध समस्यांवर चर्चा करून निवेदन सादर केले.

या संदर्भात महासंघाच्या वतीने नांदेड मंडळाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) तसेच मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक (CPTM), सिकंदराबाद यांना अधिकृत निवेदन पाठवण्यात आले आहे.

निवेदनाची मुख्य वैशिष्ट्ये :

  • गणपतीोत्सवातील विशेष ट्रेन: नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात नांदेड ते सावंतवाडी दरम्यान पहिल्यांदाच थेट विशेष ट्रेन चालवण्यात आली होती. या ट्रेनला प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
  • निवेदनात दोन कायमस्वरूपी साप्ताहिक एक्सप्रेस सुचवण्यात आल्या आहेत. त्यातील एक मनमाड मार्गे तर दुसरी लातूर मार्गे सुरु करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
  • ​कायमस्वरूपी सेवेची गरज: मराठवाडा आणि कोकण यांना जोडणारी थेट रेल्वे सेवा नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे ही गाडी नियमित किंवा आठवड्यातून किमान एकदा कायमस्वरूपी चालवणे अत्यंत गरजेचे आहे.
  • ​पर्यटन आणि व्यवसायाला चालना: या मार्गामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना कोकणात जाणे सुलभ होईल, तसेच पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध अधिक बळकट होतील.

​नांदेड रेल्वे प्रवासी महासंघाच्या या मागणीमुळे आता दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण मराठवाडा व कोकणातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button