कृषीकोकणमहाराष्ट्रराजकीय

रायगड जिल्ह्यातील ४० पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप

  • राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वितरण

अलिबाग, दि. २८ :  रायगड जिल्ह्यातील गरजू व पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ४० पात्र लाभार्थ्यांना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते अंत्योदय शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. या शिधापत्रिकांमुळे संबंधित लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे हे दि. २६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून निवड करण्यात आलेल्या ४० पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.

अंत्योदय अन्न योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा लाभ उपलब्ध करून देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शिधापत्रिकांचे वितरण महत्त्वपूर्ण ठरते.

या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र शेळके यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button