IndiaPost : विभागीय डाक अदालतीचे ३ नोव्हेंबर रोजी आयोजन
सहा आठवड्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित टपाल तक्रारींचे होणार निराकरण

नवी मुंबई, दि. २७ : टपाल सेवांसंदर्भातील (IndiaPost) सहा आठवड्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या
तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत
वाशी येथे विभागीय डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित तक्रारदारांनी या संधीचा लाभ
घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी यांनी केले आहे.
नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांच्या अध्यक्षतेखाली ही डाक अदालत वाशी येथील
वाशी एमडीजी इमारत, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर १६-अ, भूखंड क्रमांक २८, एमटीएनएल
कार्यालयासमोर, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
या डाक अदालतीमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक तसेच
मनीऑर्डरचे पैसे न मिळणे यांसारख्या तक्रारींवर विचार करण्यात येणार आहे. तक्रारदारांनी यापूर्वी संबंधित
अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारींचा तपशील, संबंधित अधिकाऱ्यांचे नाव व पद आणि अन्य आवश्यक माहिती
नमूद करावी. तक्रारीच्या दोन प्रती वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी, नवी मुंबई –
४००७०३ यांच्या कार्यालयाकडे पाठवाव्यात.
ज्या तक्रारदारांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी गुगल मीटद्वारे ऑनलाइन
सहभागी होण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन सहभागी होण्यासाठी
https://meet.google.com/eto-vnnx-mhf या लिंकचा उपयोग करण्याचे आवाहनही करण्यात आले
आहे.



