कोकणपर्यटनमहाराष्ट्रराजकीय

कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

वैभववाडी : कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी वैभववाडी तालुक्यातील हेत येथे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या  हस्ते संपन्न झाला. नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक योगदानाला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा आणि साहित्यिक वारशाचा सन्मान करणाऱ्या या स्मारकाच्या उभारणीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे पालकमंत्री नितेश राणे भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी म्हणाले.

यावेळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, सभापती सिद्धेश रावराणे, सुभाष रावराणे, उपसभापती साची कोलते, श्रावणी रावराणे, सुधीर नकाशे, वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष नासिर काझी, भालचंद्र साठे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button