कोकणदेश-विदेशमहाराष्ट्र
चिपळूण येथे ९ ऑक्टोबरला विभागीय डाक अदालत

रत्नागिरी : चिपळूण विभागीय डाकघर अधीक्षक यांच्या कार्यालयातर्फे विभागीय स्तरावरील डाक अदालतीचे आयोजन शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. ही अदालत अधीक्षक डाकघर कार्यालय (चिपळूण नगर परिषदेसमोर, चिपळूण – ४१५६०५) येथे पार पडणार आहे.
पोस्टाच्या कामकाजासंबंधी ज्या तक्रारींचे अद्याप निराकरण झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची या डाक अदालतीत प्रत्यक्ष दखल घेतली जाईल. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डर विषयक प्रलंबित तक्रारींवर सुनावणी होणार आहे.



