कोकणदेश-विदेशपर्यटनमहाराष्ट्र
विठ्ठलवाडी-कल्याण ते रत्नागिरी एसटीची ‘रातराणी’ बस सुरू

- रात्री ९ वाजता विठ्ठलवाडीतून सुटणार!
रत्नागिरी : ठाणे विभागातील विठ्ठलवाडी आगाराने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. विठ्ठलवाडी-कल्याण ते रत्नागिरी या मार्गावर आता दिवसाच्या बस सेवेसोबतच रात्रीची ‘रातराणी’ एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
ही एसटी बस रोज रात्री ०९:०० वाजता विठ्ठलवाडी आगारातून रत्नागिरीसाठी रवाना होईल. नोकरदार आणि रात्रीचा प्रवास प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे. रत्नागिरी आणि कोकणातील विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांनी या नवीन ‘रातराणी’ बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाच्या विठ्ठलवाडी आगाराकडून करण्यात आले आहे.
- मार्ग: विठ्ठलवाडी (कल्याण) ते रत्नागिरी
- वेळ: रात्री ०९:०० वाजता (दररोज)
- आगार: विठ्ठलवाडी आगार (ठाणे विभाग)



