कोकणदेश-विदेशपर्यटनब्रेकिंगमहाराष्ट्ररेल्वे

अखेर प्रतीक्षा संपली! कोकण रेल्वे मार्गावर १६ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस दाखल; प्रवाशांना मोठा दिलासा

रत्नागिरी : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आली आहे. सुरू झाल्यापासून केवळ आठ डब्यांसह धावणारी मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229/22230) आता १६ डब्यांची होणार आहे.

मंगळवारी मुंबईतून निघालेला १६ डब्यांचा भगव्या-केशरी रंगाचा वंदे भारतचा रेक सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वे स्थानकात दाखल झाला. 5 वाजून 5 मिनिटांनी तो मडगावच्या दिशेने रवाना झाला. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर 16 डब्यांची वंदे भारत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत सुरू झाल्यापासून 8 डब्यांचीच धावत होती. मात्र हे 8 डबे कायम हाऊसफुल्ल असायचे. प्रवाशांना तिकीट मिळणे कठीण होत होते. त्यामुळे विविध प्रवासी संघटना आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी ८ ऐवजी १६ किंवा २० डब्यांची वंदे भारत  एक्सप्रेस चालवावी, अशी मागणी लावून धरली होती.

या मागणीला अखेर यश आले असून 16 डब्यांचा रेक कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाला आहे. ही सेवा कायमस्वरूपी 16 डब्यांची असणार की तात्पुरती वाढ आहे, हे अद्याप रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. मात्र सध्या तरी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button