कोकणमहाराष्ट्र

जलसंधारण कामांचा परिणाम मोजण्यासाठी ‘sindhudurg.ai’ प्रणालीचा होणार

वापरजिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सॉफ्टलॅब्स ग्रुप मालवण यांच्याकडून सादरीकरण

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांचा प्रत्यक्ष परिणाम मोजण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित सॉफ्टलॅब्स ग्रुप मालवण यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या ‘sindhudurg.ai’ या डिजिटल प्रणालीचा वापर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे जलस्रोतांवर झालेला परिणाम, तसेच परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत झालेला बदल यांचे विश्लेषण करण्यासाठी या प्रणालीचा प्रामुख्याने उपयोग केला जाणार आहे. यासाठी प्रणाली अपग्रेड करण्यासह आवश्यक माहितीचे संकलन व विश्लेषण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.
या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी ‘सॉफ्टलॅब्स ग्रुप’च्या प्रतिनिधींनी ‘sindhudurg.ai’ या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाचे आणि नियोजनाचे सादरीकरण केले. जलसंधारणाच्या कामांचे मूल्यमापन अधिक अचूकपणे करता यावे, यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करणे आणि त्यासाठी पूरक माहिती तयार करण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्यांसह विविध जलसंधारण कामांमुळे स्थानिक जलस्रोतांच्या स्थितीत कोणते बदल झाले, याचा अभ्यास या प्रणालीच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे. विशेषतः बंधाऱ्यांच्या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीतील बदल आणि जलसंधारणाच्या कामांचा परिणाम यांची माहिती संकलित करून तिचे विश्लेषण केले जाणार आहे. या विश्लेषणातून जलसंधारणाच्या कामांची परिणामकारकता समजून घेण्यास आणि भविष्यातील कामांचे नियोजन अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मनोज भोगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे,
सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या मालवणचे मुख्यकार्यकारी अधिकारी मिथिलेश बांदिवडेकर, मुख्यविपनन अधिकारी मकरंद पाटकर, विजय केनवडेकर आदी उपस्थित होते.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button