कोकणमहाराष्ट्र

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे “जिल्हास्तरीय वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक २१ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. सुशील शिवलकर, प्राचार्य, डायट, रत्नागिरी, डॉ. केतन चौधरी ,प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव, श्री. राहुल बर्वे, जेष्ठ अधिव्याख्याता, डायट, श्री. राजेंद्र लठ्ठे, अधिव्याख्याता, डायट आणि श्री. प्रवीण मोने, तज्ञ मार्गदर्शक हे मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रशिक्षण कालावधीत श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. रत्नागिरी आणि श्री. नरेंद्र गावंड, विस्तार अधिकारी, (प्राथ.) जि.प. रत्नागिरी यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीसंदर्भातील आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, त्यांच्या प्रशासकीय व शैक्षणिक ज्ञानात भर घालणे तसेच अध्यापन क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार त्यांना सक्षम बनविणे हे आहे. प्रशिक्षणादरम्यान शिक्षण विभागातील तज्ज्ञ अधिकारी व मार्गदर्शकांच्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. श्रीमती. अश्विनी काणे व श्रीमती. दिपाली जंगम या प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथील परिषद दालन, प्रशिक्षणार्थीची निवास व्यवस्था तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

या प्रशिक्षणात सुमारे ७६ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून त्यांना आधुनिक शैक्षणिक वातावरणात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.
या कार्यशाळेमुळे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला चालना मिळून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास हातभार लागणार आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button