कोकणदेश-विदेशपर्यटनमहाराष्ट्ररेल्वे

Konkan Railway | कोकणातून धावणाऱ्या  ‘या’ सुपरफास्ट गाडीचा क्रमांक आणि श्रेणीमध्ये होणार बदल!

मुंबई : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम एक्सप्रेसच्या (गाडी क्र. २२११३/२२११४) श्रेणी आणि रेल्वे क्रमांकामध्ये  बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार, ही गाडी आता ‘सुपरफास्ट’ ऐवजी ‘मेल/एक्सप्रेस’ वर्गवारीत धावणार असून तिचा नवीन क्रमांक ११०७३ / ११०७४ असा असणार आहे. हे नवीन बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत.

​वेळापत्रक आणि मार्ग:

ही कोकण रेल्वे मार्गे धावणारी गाडी मुंबईतून दर मंगळवार आणि शनिवारी तिरुअनंतपुरमसाठी सुटते, तर तिरुअनंतपुरम येथून मुंबईसाठी दर सोमवार आणि गुरुवारी धावते.

महत्त्वाचे थांबे :

कोकण रेल्वे मार्गावरन धावताना ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पेडणे, मडगाव आणि कारवार या प्रमुख व ठळक थांब्यांवरून ही गाडी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बदलाची नोंद प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button