Konkan Railway | कोकणातून धावणाऱ्या ‘या’ सुपरफास्ट गाडीचा क्रमांक आणि श्रेणीमध्ये होणार बदल!

मुंबई : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम एक्सप्रेसच्या (गाडी क्र. २२११३/२२११४) श्रेणी आणि रेल्वे क्रमांकामध्ये बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार, ही गाडी आता ‘सुपरफास्ट’ ऐवजी ‘मेल/एक्सप्रेस’ वर्गवारीत धावणार असून तिचा नवीन क्रमांक ११०७३ / ११०७४ असा असणार आहे. हे नवीन बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत.
वेळापत्रक आणि मार्ग:
ही कोकण रेल्वे मार्गे धावणारी गाडी मुंबईतून दर मंगळवार आणि शनिवारी तिरुअनंतपुरमसाठी सुटते, तर तिरुअनंतपुरम येथून मुंबईसाठी दर सोमवार आणि गुरुवारी धावते.
महत्त्वाचे थांबे :
कोकण रेल्वे मार्गावरन धावताना ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पेडणे, मडगाव आणि कारवार या प्रमुख व ठळक थांब्यांवरून ही गाडी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बदलाची नोंद प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



