देश-विदेशमहाराष्ट्ररेल्वे

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!

  • दहा रेल्वे गाड्यांचे नंबर बदलले, सुपरफास्टचा दर्जा रद्द

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाने कोकण मार्गावरील 10 लोकप्रिय गाड्यांचे नंबर आणि त्यांची श्रेणी बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा बदल 01 जानेवारी 2027 पासून लागू होणार आहे.

यामध्ये सुपरफास्ट आणि गरीब रथ म्हणून धावणाऱ्या गाड्यांना आता साध्या मेल / एक्सप्रेस श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे या गाड्यांच्या तिकीट दरातही बदल होण्याची शक्यता आहे.

सुपरफास्टच्या एक्सप्रेस झालेल्या गाड्या याप्रमाणे :

1. LTT – तिरुवनंतपुरम मार्ग:
22113 (सुपरफास्ट) -> आता 11073 एक्सप्रेस (05 जानेवारी 2027 पासून)
22114 (सुपरफास्ट) -> आता 11074 एक्सप्रेस (04 जानेवारी 2027 पासून)

2. LTT – करमाळी (गोवा) मार्ग:
22115 (AC सुपरफास्ट) -> आता 11053 एक्सप्रेस
22116 (AC सुपरफास्ट) -> आता 11054 एक्सप्रेस (07 जानेवारी 2027 पासून)

3. LTT – तिरुवनंतपुरम गरीब रथ :
12201 गरीब रथ -> आता 16371 एक्सप्रेस (01 जानेवारी 2027 पासून)
12202 गरीब रथ -> आता 16372 एक्सप्रेस (03 जानेवारी 2027 पासून)

4. गोवा – दिल्ली मार्ग:
12779 वास्को – निजामुद्दीन सुपरफास्ट -> आता 17379 एक्सप्रेस
12780 निजामुद्दीन – वास्को सुपरफास्ट -> आता 17380 एक्सप्रेस

5. मडगाव – मंगलुरू पॅसेंजर:
56615 -> आता 56216
56616 -> आता 56215

प्रवाशांसाठी सूचना: 1 जानेवारी 2027 नंतर तिकीट बुक करताना जुन्या नंबरने शोधू नका. नवीन नंबर लक्षात ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

    डिजीकोकण टीम

    कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

    Related Articles

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Back to top button