कोकणमहाराष्ट्र
खेड तालुक्यात २८ सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान

- विमुक्त व भटक्या जाती-जमातींसाठी ११ मंडळांत विशेष शिबिरे
रत्नागिरी, दि. २५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावर २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी मनुज जिंदल सूचनेनुसार खेड तालुक्यातील ११ महसूल मंडळांमध्ये विमुक्त व भटक्या जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही सर्व शिबिरे सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विविध ठिकाणी एकाच वेळी पार पडणार आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी दिली.
या विशेष शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यात प्रामुख्याने:
- शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध दाखले
- जातीचे दाखले व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
- नवीन आधार नोंदणी व दुरुस्ती
- नवीन शिधापत्रिका वाटप व दुरुस्ती
- सातबारा व महसूल विषयक सेवांचा समावेश आहे.
शिबिरांची ठिकाणे आणि नियुक्त केंद्र चालक: - खेड शहर: एल. पी. इंग्लिश स्कूल (प्राथमिक विभाग) – सौरभ बुटाला.
- चिंचघर मंडळ: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दस्तुरी – नंदिनी खांबे व दुर्वास बेंडखळे.
- भरणे: ग्रामपंचायत कार्यालय सभागृह – अरुण काकडे, अमितकुमार उपाणेकर व समृद्धी वनारकर.
- तळे व आंबवली मंडळ: राधाकृष्ण हॉल, सुकिवली – समीर साबळे, दिनेश शिर्के व रूपेश चोचे.
- लवेल व धामणदिवी मंडळ: ग्रामपंचायत कार्यालय, घाणेखुंट – अमर शेलार व तुषार दिवेकर.
- भोस्ते मंडळ: भोस्ते ग्रामपंचायत कार्यालय – सुमित पेटकर.
- धामणंद मंडळ: ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, धामणंद – किरण तायडे व विक्रम सणघर.
- कुळवंडी मंडळ: छत्रपती शिवाजी हायस्कूल, कुळवंडी – संतोष कालप व समीर सकपाळ.
- शिर्शी मंडळ: ग्रामपंचायत कार्यालय, सवणस खुर्द – त्रिशा धुलप, ओंकार भोसले, मंदार आपटे, संदेश साळुंके व कपिल तांबे.
या शिबिरांचे नियोजन आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रचार करण्याची जबाबदारी सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि पोलीस पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नेमून दिलेल्या सर्व महा ई-सेवा व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आवश्यक संगणकीय साहित्यासह वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे निर्देश तहसीलदार सुधार सोनवणे यांनी दिले आहेत. गरजू नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्मती पाटील यांनी केले आहे.



