कोकणदेश-विदेशमहाराष्ट्र

प्रशांत कदम यांची ठाणे जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड


देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील हातिव गावचे सुपुत्र व ह्युमन राईट संघटनेचे राष्ट्रीय सचिव गणपत लक्ष्मण कदम यांचे सुपुत्र व ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील प्रशांत गणपत कदम यांची ठाणे जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सलग ४ वर्षे ते या पदावर ते कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या बार असोसिएशन निवडणुकीत त्याची भरघोस मतांनी निवडून येत निवड करण्यात आली आहे.

प्रशांत यांनी आपली वकीलीची सुरुवात जिल्हा न्यायालयात रत्नागिरी येथून सुरू केली होती. त्यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध वकील केतन घाग यांचे असिस्टंट म्हणून काम पहात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घेतल्यानंतर ते ठाणे जिल्हात वकिली व्यवसाय करत आहेत. त्याचा ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


हातीवचे सरपंच कदम, भाजपाचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या सौ. रश्मी कदम. मानवाधिकार संघटनचे प्रमोद केसरकर. बाळकृष्ण वनकर. तेजस भोपळकर यांचेसह अनेक पदाधिकारी यांनी हि प्रशांत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button