आरोग्यकोकणमहाराष्ट्र

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत उरणमध्ये स्वच्छता अभियान

उरण दि १ (विठ्ठल ममताबादे ) : “स्वच्छता हि सेवा” ह्या स्वच्छता अभियानाअंतर्गत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ह्यांच्या मार्फत पदमश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. दादासाहेब धर्माधिकारी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहर व ४४ गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या स्वच्छता अभियानामध्ये २३३१ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला होता. तसेच हया स्वच्छता अभियानात ८७.११४ टन ओला कचरा गोळा करण्यात आला. ह्या अभियानामध्ये अनेक शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button