कोकणातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार?

- आमदार प्रमोद जठार यांनी घेतली कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांची भेट
- राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी स्थानकांवर एक्सप्रेस थांब्यांची मागणी
रत्नागिरी : कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांवर आणि विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विधान परिषदेचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रमोद जठार यांनी कोकण रेल्वेच्या ‘मुख्य परिचालन व्यवस्थापकांची’ (COM) प्रत्यक्ष भेट घेतली.
कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर विविध एक्सप्रेस गाड्यांचे थांबे मिळावेत, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. कोकणवासीय , ग्रामस्थ आणि पर्यटकांना दळणवळणाच्या बाबतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर तातडीने उपाययोजना करून रेल्वे प्रवास अधिक सुलभ करावा, असा आग्रह आमदार प्रमोद जठार यांनी धरला. तसेच रेल्वे स्थानकांच्या परिसरातील इतर समस्यांकडेही यावेळी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. लवकरच या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला असून, कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे.



