कोकणमहाराष्ट्रसाहित्य-कला

‘कोकण मीडिया’ कथा स्पर्धेत चिपळूणच्या विशाखा चितळे प्रथम

रत्नागिरी : कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून चिपळूण येथील विशाखा हेमचंद्र चितळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यंदाचा दिवाळी विशेषांक कोकणातील लोककला आणि लोकसंस्कृती या विषयाला वाहिलेला आहे. येत्या चार नोव्हेंबर रोजी मुंबईत मान्यवरांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होणार आहे. पालघरपासून सिंधुदुर्ग-गोव्यापर्यंतच्या संपूर्ण कोकणातील लोककला-लोकसंस्कृती या विषयावरील अभ्यासकांचे माहितीपूर्ण लेख, पारितोषिकप्राप्त कथांसह अन्य कथा, तसेच अन्य विषयांवरील विशेष लेख, कविता, व्यंगचित्रे अशा वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानीचा आस्वाद या अंकातून घेता येणार आहे. कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे यंदा अकरावे वर्ष आहे.

या अंकाच्या निमित्ताने लोककला-लोकसंस्कृती या विषयावरील कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले आहे. कथा स्पर्धेचा निकाल असा : प्रथम : विशाखा हेमचंद्र चितळे (चिपळूण, कथेचे नाव : नाच्या), द्वितीय : सौ. स्वानंदी स्वरूप जोगळेकर (साखरपा) कथेचे नाव : नांदी), तृतीय : स्नेहल माळकर-फणसळकर (माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, कथेचे नाव : अंको)

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button