‘कोकण दर्शन’मधून घडणार टिके आणि चिंचखरीची सफर!

रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून ‘कोकण दर्शन’ या पर्यटन विषयक विशेष मालिकेअंतर्गत ‘सफर रत्नागिरीतील अपरिचित स्थळांची या मालेत टिके आणि चिंचखरीची’ या गावांची सफर घडणार आहे.
कोकणात अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेतच मात्र कोकणातील अनेक छोट्या गावांमधूनही निसर्गाचा सौंदर्य बघायला मिळतं तिथली अद्भुत देवस्थाना त्यांची वैशिष्ट्य त्यांचा ऐतिहासिक वारसा आजूबाजूच्या परिसरात आढळणारी ठिकाण याचा मागोवा घेणारा अपरिचित स्थळांची मालिका असणारा कोकण दर्शन चा हा भाग शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८:४० वाजता प्रसारित होणार आहे.
या भागात टिके येथील राम मंदिर, हाकरवणे झरा, सध्याच्या तरुण पिढीने प्रसिद्ध केलेला सूर्यास्ताचा पॉईंट, तसंच चिंचखरीमधलं पवित्र दत्तस्थान, त्याचं महात्म्य या विषयीची माहिती श्रोत्यांना अनुक्रमे दीपिका टिकेकर आणि संतोष बोरकर यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांनी केले असून, निवेदन व निर्मिती सहाय्याची जबाबदारी सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांनी सांभाळली आहे. या भागाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या १०१.५ मेगाहर्ट्झ (FM) आणि ११४३ किलोहर्ट्झ मध्यम लहरींवर (MW) थेट ऐकता येईल. तसेच, डिजिटल माध्यमांवर श्रोत्यांसाठी हा कार्यक्रम ‘NewsOnAir’ मोबाईल ॲपवर, ‘airratnagiri1248’ या युट्यूब चॅनेलवर तसेच फेसबुक आणि इन्स्टाग्राम (@airratnagiri) पेजवरही उपलब्ध असणार आहे. कोकणातील निसर्ग व संस्कृतीप्रेमी श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



