महाराष्ट्र

रत्नागिरीत दोन फाईव्ह स्टार हॉटेल; ७०० तरुणांना रोजगार मिळणार

    • पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

    रत्नागिरी, दि. १२ :  नोव्हेंबर: रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यात लवकरच दोन फाईव्ह स्टार हॉटेल सुरू होणार आहेत, ज्यामुळे सुमारे 700 स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

    पालकमंत्री सामंत म्हणाले, “रत्नागिरीत दोन फाईव्ह स्टार हॉटेल सुरू होत आहेत. एक म्हणजे ‘महिंद्रा क्लब’, त्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर दुसरे हॉटेल ‘एक्स्प्रेस-इन’ (Express-In) चे असून ते रत्नागिरीतील चंपक मैदानावर उभारले जाणार आहे.”

    या दोन्ही पंचतारांकित हॉटेलमुळे रत्नागिरीतील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून हॉटेल इंडस्ट्री, हॉस्पिटॅलिटी आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

    रत्नागिरीत विमानतळ, हाय-एंड रिसॉर्ट्स आणि आता फाईव्ह स्टार हॉटेल्समुळे कोकणातील पर्यटनाचे चित्र बदलणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

    डिजीकोकण टीम

    कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

    Related Articles

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Back to top button