कोकणपर्यटनमहाराष्ट्रशिक्षण

Ratnagiri | अनंत चतुर्दशी दिवशी भाट्ये बीचवर निर्माल्य संकलन

  • रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाऊन, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा उपक्रम

रत्नागिरी : इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी (Ratnagiri) मिडटाऊन, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, GCF-ECRICC प्रकल्प, कांदळवन कक्ष, नारळ संशोधन केंद्र आणि ग्रामपंचायत भाटे यांच्या संयुक्त विद्यमाने भाटे बीच येथेअनंत चतुर्दशी दिवशी “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत निर्माल्य संकलन करण्यात आले. 

रत्नागिरी शहर आणि भाटे परिसरातील बहुतांशी घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जना करीता भाटे बीच येथे आणण्यात येतात. गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य गोळा करण्यात आले. याही वेळी सर्व गणेश भक्तांनी उस्फूर्तपणे स्वतःहून निर्माल्य संस्थांकडे सुपूर्द केले. प्राप्त निर्माल्याचे सेंद्रिय आणि असेंद्रिय असे वर्गीकरण करण्यात आले आणि सेंद्रिय पदार्थ यात मुख्यतः फुलोरा, झाडाची पाने फुलेयाचा समावेश असतो हे सर्व सेंद्रिय पदार्थ नारळ संशोधन केंद्र येथील प्रमुख डॉ मालशे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले .प्राप्त सर्व सेंद्रिय पदार्थांपासून जैविक विघटनाद्वारे खत निर्मिती करून सदर खत नारळाच्या झाडांना देण्यात येते.
रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊन चे खजिनदार श्री सिताराम सावंत, असिस्टंट गव्हर्नर श्री बिपिन चंद्र गांधी, इनर विल क्लब चे अध्यक्ष सौ सुवर्णा चौधरी, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ केतन चौधरी, भाटे ग्रामपंचायत च्या ग्रामविकास अधिकारी श्रीमती सरस्वती माटे, कांदळवन कक्षाचे श्री ऋषिकेश भाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व स्वयंसेवकांच्या साह्याने आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी निर्माल्या संकलन केले तसेच बीचची साफसफाई केली.

यावेळी सुमारे 300 किलो निर्माल्य गोळा करण्यात आले आणि नारळ संशोधन केंद्र भाटे येथे सुपूर्द करण्यात आले.सदर कार्यक्रम सेवा संकल्प अभियान अंतर्गत यशस्वीपणे राबविण्यात आला.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button