वीर वाजेकर महाविद्यालयातर्फे नागाव पिरवाडी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे आणि सागरी विकास मंच, राऊंड फॉरेस्ट कांदळवन, उरण वन विभाग, लायन्स क्लब वीर वाजेकर कॅम्पस, यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथील नागाव पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. पर्यावरण संवर्धन, सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे ५०० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
वीर वाजेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र दल (NCC), यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम पार पडला. वीर वाजेकर महाविद्यालयासोबतच यू. इ. एस. कॉलेज, केडीएस कॉलेज, उरण तसेच काळसेकर कॉलेज, पनवेल येथील विद्यार्थ्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी आपल्या मनोगतात समुद्रकिनारा हा केवळ पर्यटनाचे ठिकाण नसून पर्यावरणीय समतोल, सागरी जैवविविधता आणि भविष्यातील अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. “आपला सागरकिनारा, आपली जबाबदारी” या भावनेतून सातत्याने स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी आपल्या मनोगतात समुद्रकिनारा हा केवळ पर्यटनाचे ठिकाण नसून पर्यावरणीय समतोल, सागरी जैवविविधता आणि भविष्यातील अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. “आपला सागरकिनारा, आपली जबाबदारी” या भावनेतून सातत्याने स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांनी कचरा इतरत्र न टाकता कचराकुंड्यांचा वापर करावा, यासाठी जागोजागी कचराकुंड्या उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले. पर्यटकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमासाठी ग्रेंडवेल कंपनी, श्री हितेश शहा व श्री कौशिक शहा यांचे कडून विद्यार्थ्यांना हातमोजे, मास्क, पिण्याचे पाणी व अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात आला. तसेच नागाव व म्हातवली ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा संकलनासाठी कर्मचारी व घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली.
या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी, सागरी विकास मंचाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसुधारणा मंडळाचे सदस्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संदीप घोडके, प्रा. राम गोसावी, प्रा. बी. पी. पवार, डॉ. राजकुमार कांबळे, डॉ आर बी पाटील डॉ जावळे आर एस डॉ श्रेया पाटील डॉ पालवे डॉ तांदळे प्रा. गजानन चव्हाण, प्रा. श्रीकांत गोतपागर, डॉ. झेलम झेंडे, डॉ सोनावले प्रा. भूषण ठाकूर, प्रा. प्रांजल भोईर, प्रा तन्वी कोळी प्रा प्रियांका ठाकूर प्रा दीक्षित म्हात्रे, ऋतुजा घरत प्रा रेणू माळी प्रा. देवेंद्र कांबळे, प्रा. योगेश कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयातील अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून स्वच्छता केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही स्वच्छता मोहीम यशस्वी ठरली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून स्वच्छता केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही स्वच्छता मोहीम यशस्वी ठरली.



